top of page

यमद्वितीयेला यमदीपदान का करतात ?

  • श्री विनोद पंचभाई
  • Nov 13, 2020
  • 2 min read

धनत्रयोदशी दिवशी सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी यमदिप दान करतात आपल्या कुटूंबात अपमृत्युचे सावट येऊ नये यासाठी दिपदान हा विधी करतात.


घराबाहेर ११ किंवा २१ कणकेचे दिवे पेटवुन त्या दिव्यांची ज्योत दक्षिणेस करून पुजन करावे


सहसा दक्षिणेला ज्योत करून दिवा ठेवत नाही पण फक्त याच दिवशी तसे दिवे ठेवुन पुजा करतात कारण दक्षिण दिशेचा स्वामी यमदेव आहे. या देवतेस आपण अकाल मृत्यूहरणासाठी त्या दिवशी दिपदान करतो म्हणुन दक्षिणेकडे दिव्याची ज्योत करून दिवे ठेवावेत

नंतर दिव्यांना घरच्या सवाष्णीने हळद कुंकू सफेद फुले व अक्षता वाहुन नमस्कार करावा व दक्षिणेकडे तोंड करून खालील श्लोक एकवेळा म्हणणे.


मृत्युनाम् पाश दंण्डाभ्यांम् कालेन श्यामयासह ।

त्रयोदश्याम् दिप दानात् सूर्यजः प्रीयताम् मम ।।


आणि यम देवाकडे आपल्यावर व आपल्या कुटूंबावर अपमृत्यू येवु देवु नको यासाठी प्रार्थना करावी

कुटूंबातील कोणीही व्यक्ती आपल्या कुटूंबाच्या भल्यासाठी हा उपाय करू शकते

तसेच कणकेचा मोठा एक दिवा लावला तरी चालेल.


--------------------------

पौराणिक कथा

---------------------------


एकदा यमराजाने आपल्या दुतास एक प्रश्न विचारला, "काय रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत, पण हे करीत असतांना असा एखादा प्रसंग घडला का की , ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले, तुम्हालाही दु:ख झाले ?" थोडा विचार करून दुतांनी उत्तर दिले, "आठवतो... असा एक प्रसंग, आम्हाला आठवतो !" धर्मराज म्हणाले, "सांग बरं !" दूत म्हणाले, " महाराज, पृथ्वीवरील हेमराज नांवाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करतांना आम्हाला अतिशय दु:ख झाले, कारण महाराज, या राजकुमाराचा विवाह चार दिवसांपूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात , राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता, पण, तो आनंद संपण्याच्या आत..., राजपुत्राने आपल्या विवाहाचा साजश्रुंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करतांना आमचे डोळे ओले झाले. तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले".


हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले. त्यांच्याही डोळ्यात पाणी आले.

तोच दूत पुढे म्हणाला, "महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्युचा प्रसंग कुणावरही येऊ नये असे काहीतरी करा !"

विचार करून यमराज म्हणाले, "ठिक आहे, जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पांच दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्यावर असा अपमृत्युचा प्रसंग येणार नाही." तेव्हापासून ही यमदीपदानाची प्रथा पडली आहे, असे मानतात.

-----------------------------------------------


आपली हिन्दूधर्म संस्कृती

Comments


Subscribe Form

Thanks for submitting!

  • Instagram
  • Facebook

©2020 by श्री कार्यसिद्धी.

bottom of page