हिवाळ्यात त्वचेची निगा अशी राखावी
- Akanksha
- Dec 7, 2020
- 1 min read
Updated: Dec 21, 2020
हिवाळ्यात शरीराचे रक्ताभिसरण कमी होते आणि पाणीही कमी पिले जाते. तसेच बाहेरच्या वातावरणामुळे आपली त्वचा कोरडी पडते . त्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी:

हिवाळ्यात भरपूर पाणी प्यावे जेणेकरून आपल्या शरीराची आर्द्रता टिकून राहते .
थंडीच्या दिवसात त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा तसेच सुकामेवा, रानमेवा व मोसमी फळांचाही समावेश करावा.
कोरड्या त्वचेसाठी कोरफडीच्या गरामध्ये बदामाचे तेल मिसळून चेहऱ्यावर मसाज करावा . त्याने चेहरा तजेलदार होतो आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
त्वचा कोरडी झाल्यास हळद, बेसन, लिंबाचा रस , मध आणि साय याचा पॅक बनवून चेहऱ्यावर मसाज करावा आणि 10 मिनिटाने कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा . याने त्वचा मुलायम राहते.
थंडीच्या दिवसात अति गरम पाण्याने स्नान करू नये. कारण गरम पाण्याने त्वचेची आर्द्रता कमी होते आणि कोरडी पडते. तसेच स्नानाच्या आधी तीळ, बदाम किंवा खोबरेल तेलाने संपूर्ण शरीराला मसाज करावा.
थंडीच्या दिवसात ओठ कोरडे पडतात किंवा फाटतात, त्यासाठी ओठांवर लोण्याने किंवा सायीने मसाज करावा.
थंडीमुळे पाय कोरडे पडत असतील तर गरम पाण्यात मीठ व खोबरेल तेलाचे काही थेंब टाकून पाय बुडवून - दहा-पंधरा मिनिटे बसावे.
Comments