top of page

स्नानाचे प्रकार आणि फायदे

  • श्री विनोद पंचभाई
  • Jan 16, 2021
  • 1 min read

उत्तम स्वास्थ्य आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान करणे आवश्यक आहे. स्नान करण्याची सर्वात योग्य वेळ सकाळची आहे.


शास्त्रामध्ये सकाळी लवकर स्नान करण्याचे चमत्कारिक फायदे सांगण्यात आले आहेत. स्नान करताना येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते तसेच कुंडलीतील इतर दोषही नष्ट होतात. सकाळी लवकर स्नान केल्यास आरोग्यदायी लाभही होतात.

स्नान करताना वरील मंत्राचा जप करणे श्रेष्ठ राहते...


स्नानाचे प्रकार आणि फायदे...


- ब्रह्म स्नान :

सकाळी-सकाळी ब्रह्म मुहूर्त म्हणजे जवळपास ४-५ वाजता देवाचे स्मरण करत केलेले स्नान ब्रह्म स्नान असते.

■ असे स्नान करणाऱ्या व्यक्तीला कुलदैवतेची विशेष कृपा प्राप्त होते आणि जीवनात दुःखांचा सामना करावा लागत नाही.


- देव स्नान :

सध्याच्या काळात बरेच लोक सूर्योदयानंतर स्नान करतात. जे लोक सूर्योदयानंतर एखाद्या नदीमध्ये स्नान करतात किंवा घरातच विभिन्न नद्यांचे नामस्मरण करत स्नान करतात, याला देव स्नान असे म्हणतात.

■ अशा प्रकारे स्नान केल्यास व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होतात


ऋषी स्नान

जे लोक सकाळी-सकाळी आकाशामध्ये तारे दिसत असताना स्नान करतात, त्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात.


मानव स्नान

सामान्यतः जे स्नान सूर्योदयापूर्वी केले जाते त्याला मानव(मनुष्य) स्नान म्हणतात. सूर्योदयापूर्वी केलेलं स्नानच सर्वश्रेष्ठ असते.

- सध्याच्या काळात सूर्योदयानंतर चहा-नाश्ता झाल्यानंतर बरेच लोक स्नान करतात. अशा प्रकरच्या स्नानाला दानव स्नान म्हणतात. शास्त्रानुसार आपण ब्रह्म स्नान, देव स्नान किंवा ऋषी स्नान करावे.......


गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति।


नर्मदे सिन्धु कावेरी जलऽस्मिन्सन्निधिं कुरु।।


---------------------------------------

"स्नान करताना वरील मंत्राचा उच्चार केल्यास मिळेल तीर्थ स्नानाचे फळ"

---------------------------------------

Recent Posts

See All
ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

 
 
 

Comments


Subscribe Form

Thanks for submitting!

  • Instagram
  • Facebook

©2020 by श्री कार्यसिद्धी.

bottom of page