top of page

शुभ आणि लाभ

  • श्री विनोद पंचभाई
  • Jan 28, 2021
  • 1 min read

आपण आपल्या घराच्या दारावर सभोवतालच्या भिंती वर शुभ आणि लाभ असे लिहितो.

हे का लिहितो आणि याचा गणपतीशी काय संबंध असे, चला तर मग जाणून घेऊ, या बद्दलची थोडक्यात माहिती.



smartpuja.com

श्रीगणेशाचे दोन मुले शुभ आणि लाभ :





महादेवाचे पुत्र गणेश (गणपती) याचे लग्न प्रजापती विश्वकर्मा यांचा दोन्ही मुली रिद्धी आणि सिद्धीशी झाले. सिद्धीपासून शुभ किंवा क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे असे दोन मुले झाले. लोक परंपरेत यांनाच शुभ आणि लाभ म्हणतात.

गणेशपुराणानुसार शुभ आणि लाभाला केशं आणि लाभ या नावाने देखील ओळखले जाते.

सिद्धी शब्दाचा अर्थ आहे

'बुद्धी'ज्याला हिंदी भाषेत शुभ म्हणतात. त्याच प्रमाणे सिद्धी शब्दाचा अर्थ आहे 'आध्यात्मिक शक्तीची पूर्णता' म्हणजे 'लाभ'.


शुभ आणि लाभाची मुले : शास्त्रांमध्ये तुष्टी आणि पुष्टीला गणपतीच्या सून म्हटले आहे. श्री गणेशाचे नातवंड आमोद आणि प्रमोद आहे.

मान्यतेनुसार गणपतीची एक संतोषी नावाची मुलगी देखील होती. संतोषी मातेच्या वैभवाबद्दल आपल्या सर्वांना तर माहितीच असणार. शुक्रवार तिचा दिवस आहे आणि या दिवशी उपवास धरतात.


चौघडिया -

जेव्हा आपण एखादा चौघडिया किंवा मुहूर्त बघतो तेव्हा अमृत व्यतिरिक्त शुभ आणि लाभ

महत्त्वपूर्ण मानले जाते.


दारावर :

श्री गणेशाच्या मुलांची नावे आपण स्वस्तिकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस लिहितो. घराच्या मुख्यदारावर 'स्वस्तिक' मुख्यदाराच्या मध्यभागी आणि शुभ लाभ डाव्या उजव्या बाजूस लिहितात. स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा गणपतींच्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धीला दर्शवितात.

घराच्या बाहेर शुभ-लाभ लिहिण्याचा अर्थ असा आहे की आमच्या घरात सुख आणि समृद्धी कायम राहो.

लाभ लिहिण्यामागील भावना अशी आहे की आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमच्या घरात उत्पन्न आणि संपत्ती वाढतच राहो, त्याचा आम्हाला फायदा मिळत राहो.


घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक,

शुभ आणि लाभ या शक्तींचे प्रतीक आहे :

गणेश (बुद्धी) + रिद्धि (ज्ञान) = शुभ।

गणेश (बुद्धी) + सिद्धी (आध्यात्मिक स्वातंत्र्य )




Recent Posts

See All
ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

 
 
 

Comments


Subscribe Form

Thanks for submitting!

  • Instagram
  • Facebook

©2020 by श्री कार्यसिद्धी.

bottom of page