top of page

संकष्ट चतुर्थी माहात्म्य

  • श्री विनोद पंचभाई
  • Jan 2, 2021
  • 2 min read

( सर्व संकटांचा नाश करून इच्छित फळ शीघ्र प्राप्त करून देणारे श्रीगणपतीचे व्रत )

संकष्ट चतुर्थी व्रत...🚩🙏🏻

प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यांत वद्य चतुर्थीच्या दिवशीं "संकष्ट चतुर्थी" असते.

हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करून, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळीं श्रीगणपतीचीं पूजा करून, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचें. अशी या व्रताची थोडक्यांत पाळणूक आहे.🙏🏻🚩

"श्रीसंकष्टहरगणपती" हे या व्रताच्या देवतेचें नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषानें, व्रताला सुरवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशीं करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचें उद्यापन करावें.🙏🏻🚩

कांहींजण इच्छा पूर्ण होईपर्यत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणारांनीं उपोषण सोडवण्यापूर्वी नेहमीं, पुढें दिलेलें

"संकष्ट चतुर्थी माहात्म्य" अवश्य वाचावें.🙏🏻🚩



astroclips.com


🚩संकष्टचतुर्थीचें व्रत करणारानें, त्या दिवशीं पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावीं. दीवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. संध्याकाळीं रात्रौ आवश्यक वाटल्यास आंघोळ करावीं.🙏🏻🚩

नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्यानें भरलेला कलश (तांब्या) ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रें गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यांत "श्रीसंकष्टहरगणपतीचीं" स्थापना करावीं.

(श्रीगणपतीची सोने, चांदी, तांबें वगैरे धातूची मूर्ती अगर तसबीर ) त्याची षोडशोपचारे पूजा करावी. पूजा करणारानें अंगावर लाल वस्त्र घ्यावें. पूजेत वाहावयाचें "गंध-अक्षता-फूल-वस्त्र" तांबड्य रंगाचें असावें. पूजेत उपचार अर्पण करतांना

लंबोदराय नम: म्हणून गंध, कामरूपाय, नम: म्हणून अक्षता,

सिध्दिप्रदाय नम: म्हणून पुष्प, सर्वार्थसिद्धिदाय नम: म्हणून फळ,

शिवप्रियाय नम: म्हणून वस्त्र, गणाधिपाय नम: म्हणून उपवस्त्र,

गजमुखाय नम: म्हणून धूप, मूषकवाहनाय नम: म्हणून दीप,

विप्रनाथाय नम: म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम: म्हणून, दक्षिणा अर्पण करावी.🙏🏻🚩

पूजा झाल्यावर पुढील ध्यानमंत्रा म्हणून "श्रीसंकष्टहरगणपतीचें" ध्यान करावें.

रक्तांगं रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै: ॥

क्षीराब्धौ रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थमू ॥

दोर्भि: पाशांकुशेष्टा भयधृतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ॥

ध्यायेच्छांत्यर्थमीशं गणपतिममलं श्रीसमेंत प्रसन्नमू ॥

नंतर आपलें संकट निवारण्याची व मनोकामना ( मनांतील इच्छा ) पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. 🙏🏻🚩

मम समस्तविघ्ननिवृत्यर्थ संकष्टहरगणपतीप्रीत्यर्थं चतुर्थेसेव्रतांगत्वेन

यथा मीलितोपचार द्रव्यै: षोडशोपचार पूजां करिष्ये ॥

असें म्हणावें. नंतर पुढें दिलेलें "संकष्ट चतुर्थी माहात्म्य" वाचावें.

२१ मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी.🙏🏻🚩

आरती झाल्यावर-

अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्यहीनं मया कृतम् ।

तत सर्वं पूर्णतां यातु विप्ररूप गणेश्र्वर ॥

असें म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चंद्रदर्शन करून, चंद्राला अर्ध्य, (पाणी) गंध, अक्षता, फूलें वाहून त्याची पूजा करावी. "रोहिणीनाथाय नमः " म्हणून नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावें. जेवणांत मोदक असावे, गोड पदार्थ असावेत, खारट व आंबट पदार्थ नसावेत. (चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते.) जेवण झाल्यानंतर उत्तरपूजा करून मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.🙏🏻

~~~s~~


🙏🏻संकष्टी कथा 🙏🏻🚩

एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीनें चंद्राला शाप दिला कीं "आजपासून तुझें कोणी तोंड पाहाणार नाहीं. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल! "शेवटीं चंद्रानें मोठें तप करून श्रीगणपतीला प्रसन्न करून घेतलें. चंद्राच्या तपामुळें व सर्व देवांनीं प्रार्थना केल्यामुळें गणपतीनें चंद्राला शापातून मुक्त केलें. पण वर्षातून एक दिवस "भाद्रपद शुक्ल चतुर्थींच्या दिवशीं म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशीं" तुझें तोंड कोणी पाहाणार नाहीं आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असें सांगितलें. त्यावर चंद्रानें प्रार्थना केली कीं, जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझें तोंड पाहिलें तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्यानें काय करावें? तेव्हां गणपतींनें सांगितलें कीं, त्यानें 'संकष्ट चतुर्थी व्रत " करावें, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल.

🚩गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळें श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने "संकष्ट चतुर्थी व्रत" केल्यामुळें गेला, अशी कथा आहे.

🚩आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वानीं करावयाचें, हे एक साधें, सोपें पण शीघ्र फलदायीं व्रत आहे. श्रावण महिन्यांतील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायीं व महत्वाची मानतात. प्रत्येकानें निदान वर्षांतून या दोन संकष्ट्या तरी अवश्य कराव्या.

🚩🙏🏻🚩🙏🏻

थ🚩 बोला गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩💐

Comments


Subscribe Form

Thanks for submitting!

  • Instagram
  • Facebook

©2020 by श्री कार्यसिद्धी.

bottom of page