राम रक्षा स्तोत्र म्हणजे काय
- श्री विनोद पंचभाई
- Jan 20, 2021
- 2 min read
आपण ईशवराची केलेली आर्त प्रार्थना होय. भगवंताच्या आर्शीवादासाठी स्तोत्र हा अतिशय उत्तम मार्ग आहे.

राम रक्षा हे स्तोत्रही तसेच कवच सुध्दा आहे. आपण आपले जीवन मार्गक्रमणा करत असतानां आपल्यास स्वसंरक्षणाची गरज का? कारण आपले जीवन हे एक प्रदीर्घ असा प्रवासाची वाटच आहे या प्रवासात चालत असतानांच अनेक संकटे,आघात आपल्या जीवनात येत असतात त्यावेळी अशा भगवंताच्या नावाचे कवच आपण परिधान केले तर आपणास भिती वाटणार नाही तसेच आपल्या जीवनात येणारे संकटाचा सामना करण्यास बल मिळते असा विश्वास वाटतो.
* या राम रक्षा कवचामध्ये डोक्यापासून पाया पर्यंत एकेक आल्यास भगवंताच्या नावे कवच
कमवायचे अशी कल्पना आहे. या रामरक्षास्तोत्रात ' पातु '
(म्हणजे रक्षण करा)
हा शब्द ज्या ज्या श्लोकात आलेला आहे असे सर्व श्लोक म्हणजेच कवच आहेत.
आपल्या जीवनात एखादे चागंला हेतू साध्य करण्यासाठी या स्तोत्राचे ठराविक पारायणे करणे हे आजही अनेक जन करत आहेत.आपल्या जीवनात कोणताही धोका असो,तसेच सर्व प्रकारच्या अडचणींचा निवारण होण्यासाठी या रामरक्षास्तोत्रात सकाळ-दुपार-संध्याकाळ असे त्रिकाळ पाठ करावेत अशी श्रध्दा आहे. याशिवाय आपल्या मनातील इच्छा साध्य होण्यासाठी या स्तोत्राचे पाठ करावेत.
राम ह्या शब्दाचे महत्व श्रीधरस्वामींनी खालिल प्रमाणे सांगितले आहे
जगतपालक विष्णु व शिव ह्या महेर्देवता आहेत व त्यांचे महामंत्र
नमो नारायण (नारायण तारणारा असा त्याला नमस्कार)
व
न *म: शिवाय (शिवाला नमस्कार) असे आहेत
ह्यातील *रा व म हे त्या मंत्रातील बीज अक्षरे आहेत* कारण ती अक्षरे काढल्यास
नमो नायण (न तारणार्यास नमस्कार)
न: शिवाय (शिव नसलेली सृष्टी)
मंत्राला अर्थ उरत नाही व विपर्यास होतो.
म्हणून ह्या मंत्रातील बीजक्षरापासून *रा म हे नाम तयार होते.
ह्या अर्थाने राम हा विष्णु व शिव ह्यांचा एकत्रित अवतार आहे.
तसेच
रा हे अग्निबीज व म हे माया बीज आहे म्हणून राम राम म्हंटल्याने ज्ञानाग्नी ने माया नष्ट होते.
वैखरीने राम राम म्हंटल्यास
रा म्हणताना मुख उघडे होऊन
आतील पाप व दोष बाहेर पडतात व म म्हणता
मुख बंद होऊन बाहेरील दोष आत येत नाहीत.
योग मार्गातील लोकांसाठी सुद्धा नाम सांगितले आहे कारण
रा हे सहस्त्रासार चक्राचे स्थान म्हणजे शिव व *म हे मुलाधाराचे स्थान म्हणजे जीव दर्शवते.
राम राम म्हंटल्याने कुंडलिनी शक्ती मुलाधारपासून सहस्त्रासार येथे जाऊन जीव शिव ऐक्य होते.
म्हणुन राम नामाचे महत्व अधिक आहे.
Comments