top of page

अति विचार केल्याने होणारी कामे देखील होत नाहीत किंवा लांबणीवर पडतात का ?

  • श्री विनोद पंचभाई
  • Dec 8, 2020
  • 2 min read

हो, ह्याला Paralysis of Analysis अर्थात अतिविश्लेषणामुळे येणारी निष्क्रियता म्हणतात. एक कोडं सोडवून पाहूया.


ree
executivesecretary.com

समजा तुमच्या समोर ५ दरवाजे आहेत. तुम्ही कोणत्या दरवाज्यातून बाहेर पडणार?


पहिल्या दरवाज्यामागे आग लागलेली आहे.

दुसऱ्या दरवाज्यामागे खूप जोरात आम्लवर्षा (Acid Rain) होतेय.

तिसऱ्या दरवाज्यामागे निंजा योद्धा तुम्हाला मारायला तयार आहे.

चौथ्या दरवाज्यामागे एक मोठा सिंह आहे ज्याने मागच्या १ महिन्यापासुन जेवण नाही केलय

आणि पाचव्या दरवाज्यामागे लावारस आहे.

कोडं समाप्त.


आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या दरवाज्यातून जाऊ - इकडून जाऊ की तिकडून जाऊ - इकडून गेले तर हे होईल - तिकडून गेले तर हे होईल असा विचार करतील. कमीतकमी १० - १२ विचार मनात येऊन जातील आणि डोक्यात विचारांचा एकप्रकारे गोंधळ होईल. जेवढी विचारांची गोची होते तेवढा आपला घेतला जाणारा निर्णय चुकतो कारण आपण प्रत्येक पर्यायबद्दल व्यवस्थितपणे विचार करण्यास असमर्थ असतो. कोणता पर्याय चांगला आणि कोणता पर्याय खराब हे आपण तेव्हाच ठरवू शकतो जेव्हा आपल्याकडे कमी पर्याय असतात किंवा प्रत्येक पर्यायला नीट समजून घेण्याची संयमता असते.


वरील कोड्याचे उत्तर आहे: "आपण चौथ्या दरवाज्यातून जाणार कारण ज्या सिंहाने मागच्या एक महिन्यापासून जेवण नाही केलंय तो नक्कीच मेलेला असेल न!!"


किती जणांनी ह्याचे उत्तर बरोबर दिले? आपले उत्तर ह्यामुळे नाही चुकले की तुम्ही सिंहाचा विचार केला नाही - आपले उत्तर ह्यामुळे चुकले कारण आपल्याकडे ५ दरवाजे असे ५ पर्याय होते. ह्याला Analysis of Paralysis अर्थात अतिविश्लेषणामुळे येणारी निष्क्रियता म्हणतात.


त्याचं मुख्य कारण हेच असते की ते जेव्हा काही गोष्ट खरेदी करतात तेव्हा एकापेक्षा अनेक गोष्टींचा ते विचार करतात. मी माझ्या वहिनींचा एक अनुभव सांगतो:


आम्ही एकदिवशी अगरबत्ती घेत होतो.


त्यांच्यासमोर जवळपास ७-८ वेगवेगळे पर्याय होते. ते कोणता विचार करत होते?


ह्यांना गुलाब गंध आवडत नाही.

शेजारणीकडे लवेंडर आहे.

तपकिरी अगरबत्तीचा रंग निघून जातो.

जांभळी दिसायला चांगली असते पण वास चांगला येत नाही.

पिवळा रंग आंबट आंबट वाटतो जर एक महिन्यात पिवळी अगरबत्ती संपली नाही.

निळा रंग मला आवडत नाही.

मला विचारलं की कोणता घेऊ, मी उलट प्रतिप्रश्न केला "देवासमोर अगरबत्ती लावतात आणि कोणती अगरबत्ती घ्यायची ही पसंद तुम्ही करता..


शेवटपर्यंत त्यांनी अगरबत्ती निवडलीच नाही, त्याच कारण त्यांनी अगरबत्ती निवडतांना खूप जास्त पर्याय विचारात घेतले होते म्हणून हे सगळे झाले.


हेरॉल्ड गरीन म्हणतात:


चांगला परंतु जलद गतीने घेतला गेलेला निर्णय - सगळ्यांत बेस्ट कारण खूप उशिरा घेतला गेलेल्या निर्णयापेक्षा तो फायदेशीर असू शकतो.


मी खूप छान वाचलं होत ते म्हणजे:


"आयुष्यात आपण अयशस्वी ह्यामुळे होत नाही कारण आपण काही करत नाही. आपण अयशस्वी ह्यामुळे होतो कारण आपल्याला करायला खूप काही असते आणि आपण कुठूनही सुरुवात करत नाही."


म्हणून पर्याय जेवढे कमी तेवढी निर्णय अचूकता जास्त. जर हे शक्य नसेल तर प्रत्येक पर्यायचा अभ्यास करण्याइतका संयम अंगी असायला पाहिजे.


नक्की विचार करा..

Recent Posts

See All
ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

 
 
 

Comments


Subscribe Form

Thanks for submitting!

  • Instagram
  • Facebook

©2020 by श्री कार्यसिद्धी.

bottom of page