कांद्याचे थालीपीठ
- सौ. सरोज पोतदार
- Feb 12, 2021
- 1 min read
साहित्य :
ज्वारीचे पीठ : २ वाटी
हरभरा पीठ : १/४ वाटी
गव्हाचे पीठ : १/४ वाटी
तिखट :१ चमचा
हळद : १ चमचा
मीठ : चवीनुसार
धने पूड : १ छोटा चमचा
जिरे पूड : १ छोटा चमचा
ओवा : १ छोटा चमचा
बारीक चिरलेला कांदा -१
कोथिंबीर

कृती :
ज्वारीचे पीठ, हरबरा पीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घ्यावे.
त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकावी.
नंतर त्यात हळद, तिखट, मीठ, धने पूड, जिरे पूड आणि ओवा टाकून पीठ मळून घ्यावे.
एका कढईला तेल लावून त्यावर थालीपीठ थापून घ्यावे.
कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर थालीपीठ भाजून घ्यावेत.
आपल्या आवडीच्या चटणीसोबत खायला थालीपीठ तयार आहे.



Comments