top of page

गीतेचे महत्व

  • श्री विनोद पंचभाई
  • Dec 25, 2020
  • 1 min read

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ।। २. ४७ ।।


> कर्मावर तुझा अधिकार आहे, मात्र कर्मफळांवर कदापि नाही. फळांच्या हेतूने कधीही कर्म करू नकोस, परंतू त्याचबरोबर अकर्माच्या (आळशीपणा, अविचारीपणा) आधीन होऊ नकोस.


ree


गीतेचे महत्व वर्णन करताना भगवंत म्हणतात ,


गीतेतील ज्ञान ही केवळ सर्व शास्त्राच्या अभ्यासाने प्राप्त होणारी वस्तू आहे .ती उपनिषद रुपी कमळातील सुगंध आहे. व्यासांच्या बुद्धिरूप रवीने हे अनादिसिध्द लोणी भगवंतानी काढले आहे .

गीता ही ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे .विचार रुपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेली ही दुसरी लक्ष्मी आहे .तिने आपले सर्वस्व म्हणजे पद ,वर्ण ,अर्थ वगैरे एका पुरुषोत्तमास अर्पण .केले गीता हे संसार जिंकणारे शास्त्र आहे .तिची अक्षरे हे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत .भगवंत म्हणजे चैतन्य रुपी शंकर ,त्यांच्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता ,तो बाहेर काढणारा ,श्रद्धेचे भांडार जो अर्जुन ,तो भगीरथ झाला .व म्हणून अर्जुन स्वतःच गीतेसह भगवंताचे राहण्याचे ठिकाण झाला .भगवंत म्हणतात कि ही ज्ञानाची वेळ गीता ,हिला जो जाणेल त्याचा मोह नाहीसा होईल ,त्याला आत्मज्ञान होईल ,आत्मस्वरूपी एकरूप होता येईल .


योगस्थः कुरु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजय ।

सिद्धयसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।। २. ४८ ।।


> हे धनंजया (अर्जुना), कर्म संग सोडून एखाद्या योग्याप्रमाणे अलिप्तपणे कर्म करत राहा. यश-अपयश भेद नष्ट होऊन एकसमान होणे म्हणजे समत्वयोग (कर्मयोग) असे म्हटले आहे.


शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबंधनैः ।

सन्न्यासयोगमुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ।। ९.२८ ।।


> (अशाप्रकारे) शुभ-अशुभ दोन्ही प्रकारच्या फळांपासून व कर्मबंधनांपासून मुक्त झालेला तू, सन्यास योगी मुक्तात्मा, मला येऊन भेटशील (मला प्राप्त करशील).


समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।

ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्‌ ।। ९. २९ ।।


> मी सर्व प्राणिमात्रांमध्ये समान व्याप्त आहे. मला न कोणी प्रिय आहे न अप्रिय. परंतु, जे भक्त प्रेमाने माझी भक्ती करतात, माझ्यात ते आहेत व त्यांच्यात मी आहे (आम्ही एकरूप आहोत).

Recent Posts

See All
ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

 
 
 

Comments


Subscribe Form

Thanks for submitting!

  • Instagram
  • Facebook

©2020 by श्री कार्यसिद्धी.

bottom of page